---Advertisement---
वाणिज्य

पुढील ५ वर्षांत पेट्रोल संपणार.. केंद्रीय मंत्री गडकरींचे धक्कादायक विधान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । मागील गेल्या काही काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. आजपर्यंतचे पेट्रोलने सगळे रेकॉर्ड तोडले आहे. वाढत्या इंधनमुळे वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. सरकार सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. आता अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपणार असे नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाचा संबंध वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्याशी जोडला जात आहे.

nitin gadkari petrol jpg webp

महाराष्ट्रातील अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांना विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पेट्रोलच्या पर्यायाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, विदर्भात बनवलेले बायो इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. खरतर

---Advertisement---

अन्नदाता बनण्याऐवजी शेतकरी बना
विहिरीच्या पाण्यातून ग्रीन हायड्रोजन तयार करता येतो, असेही त्यांनी सांगितले. त्याची किंमत 70 रुपये प्रति किलोपर्यंत असू शकते. शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करून ते म्हणाले की, शेतात गहू, तांदूळ, मका उत्पादन करून भविष्य बदलता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता बनण्याऐवजी ऊर्जा दाता बनण्याची गरज आहे.

गडकरी म्हणाले की, येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल. त्यांनी सांगितले की इथेनॉलवर घेतलेल्या निर्णयामुळे देशाचे वार्षिक 20,000 कोटी रुपये वाचले. तो दिवस दूर नाही जेव्हा दुचाकी आणि चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर धावतील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---