⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

इंधनाचे नवे दर जारी; गाडी पेट्रोल – डिझेल भरण्यापूर्वी वाचा आजचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले असून आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Petrol & Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र सध्या वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पहाता भविष्यात पेट्रोल, डिझेलची दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे. आज जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.