⁠ 
सोमवार, मे 6, 2024

कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ; लगेचच तपासा आजचा पेट्रोल-डिझेलचा दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । जुलैच्या मंदीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत ९० डॉलरच्या खाली गेलेला क्रूड पुन्हा १०० डॉलरच्या वर गेला आहे. पण देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहे. मागील तीन महिन्याहून अधिक काळापासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय.

कच्च्या तेलाने ओलांडला $100 चा टप्पा
जुलैच्या मध्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली पोहोचला होता. गुरुवारी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 95.33 वर पोहोचली. ब्रेंट क्रूड देखील वाढले आणि प्रति बॅरल $ 101.8 वर चढले. महाराष्ट्रातील शिंदे सरकारने सत्तेवर आल्यानंतर पेट्रोलवरील व्हॅट 5 रुपयांनी आणि डिझेलवरील 3 रुपयांनी व्हॅट कमी करून राज्यातील जनतेला दिलासा दिला होता. यापूर्वी 22 मे रोजी मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला असून पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले होते.

जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. 

तुमच्या शहरातील आजची किंमत (पेट्रोल-डिझेल 25 ऑगस्ट रोजी)

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर