---Advertisement---
वाणिज्य

Petrol-Diesel Rate : कर कपातीनंतर पेट्रोल -डिझेल झाले स्वस्त ; वाचा आजचा प्रति लिटरचा दर

petrol diesel
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । महागाईचा फटका बसत असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel) अबकारी कर (Tax) कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आज २२ मे पासून पेट्रोल 9.50 रुपयाने तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहे. यानंतर जळगावात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११२. १९ रुपयांवर आले आहे. तर डिझेलचा प्रति लिटरचा दर ९७.३४ रुपयांवर आले आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

petrol diesel

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी काल संध्याकाळी ट्विट करून पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल माहिती दिली. याआधी, 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवर 5 रुपये प्रति लिटरने कमी केले होते. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये तेलाच्या किमतीत सातत्याने दर वाढ झाली होती. त्यामुळे पेट्रोलचा दर पुन्हा १२० रुपायांवर गेला होता. तर डिझेलचा दर देखील १०५ रुपयांवर आला होता. त्यामुळे सर्वसामान्यावर दरवाढीचा अधिक भार पडला होता.

---Advertisement---

आधीच देशात महागाईचा भडका उडाला असून गेल्या काही दिवसांत महागाई मागील 9 वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे सामन्य नागरिक हवालदिल झाले होते. इंधनापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींचे दर झपाट्याने वाढत असल्यामुळे महागाईला तोंड कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

नव्या दरानुसार आज भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर १२१.६९ वरून जवळपास ११२. १९ रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे डिझेलचा प्रति लिटरचा दर ९७.३४ रुपायांवर आला आहे. यापूर्वी डिझेलचा दर १०४.३४ रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---