⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

कच्चे तेल आणखी घसरणार ; त्वरित तपासून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $90 च्या खाली आहेत. येत्या काळात कच्च्या तेलाची किंमत $70 पर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जुन्याच पातळीवर सुरू आहेत.

३ महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर 22 मे पासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील पेट्रोलच्या दरात ५ रुपयाची तर डिझेल दरात ३ रुपयाची कपात करण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.