जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil price) दिवसेंदिवस वाढत आहे. कच्च्या तेलाचे दर 123 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ सुरू असताना देखील भारतात पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. आज २५ व्या दिवशी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आज बुधवारी जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे.दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये अबकारी कर कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन संतप्त झाले आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.
कच्च्या तेलाची मागणी वाढली
सध्या रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. रशियातून होणारी कच्च्या तेलाची आयात देखील बंद केली आहे. त्यामुळे रशियात कच्च्या तेलाचा मोठा साठा निर्माण झाला होता. रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा केला. मात्र आता भारत आणि चीनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीचा धडाका लावल्याने मागणीत वाढ झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.