कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण ; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे नवीन दर
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. असे असतानाही तीन महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर आहेत. आज पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तेव्हापासून पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे आहे.
कच्चे तेल नवीनतम दर
मागील काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असून पुन्हा एकदा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $90 च्या खाली गेली आहे. आज बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $87.67 वर पोहोचली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 93.49 वर दिसले.
यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला. त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत.