⁠ 

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! पाच दिवसांत सोने 2000, तर चांदी 4000 ने घसरले, आताचे भाव तपासून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । सणासुदीत सोन्यासह चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत वाढल्या होत्या. त्यांनतर लग्नसराईत किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसून आला. एकीकडे देशभरात लग्नसराईला सुरुवात होताच सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. गेल्या दोन आठवड्यांपासून सोने-चांदीचे भाव वाढत गेल्यामुळे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ४ डिसेंबर रोजी सोन्याने ऐतिहासिक उच्चांकी गाठत होता. सोबतच चांदीनेही विक्रमी उच्चांक गाठला होता. Gold Silver Price 10 December 2023

मात्र जळगाव सुवर्णनगरीत उच्चांकीवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात काल शनिवार, ९ डिसेंबर रोजी ६५० रुपयांची घसरण दिसून आली. यामुळे २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ६२ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे. चांदीमध्येदेखील ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार रुपये प्रतितोळ्यावर आली आहे. पाच दिवसांमध्ये सोने दोन हजार आणि चांदी चार हजार रुपयांनी घसरली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरचे दर वाढत असताना सोने-चांदीचे भाव कमी झाले आहे. शेअर बाजार उसळी घेत असल्याने हे भाव कमी होत असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

४ डिसेंबर रोजी सोन्याचा दर विनाजीएसटी ६४ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तर जीएसटीसह सोन्याचा दर ६६३०० रुपयांवर गेला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर होता. त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी ५ डिसेंबर रोजी एक हजार ३०० रुपयांची घसरण झाल्याने सोने ६३ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले. ६ रोजी २५० रुपयांनी घसरण झाली. मात्र, ७ रोजी ५० रुपये आणि ८ रोजी १५० रुपयांची वाढ होऊन सोने ६२ हजार ९५० रुपयांवर पोहचले. मात्र, ९ रोजी ६५० रुपयांची घसरण झाली व सोने ६२ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले.

पाच दिवसांतील सोन्याची स्थिती पाहता त्यात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. अशाच प्रकारे चांदीच्या भावातही चढ-उतार होऊन चांदीत पाच दिवसांत चार हजार रुपयांची घसरण झाली आहे.