जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । हळूहळू पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर राहून सुमारे दोन महिने होणार आहेत. मंदीची चिन्हे असतानाच कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. क्रूड प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आले. मात्र, यादरम्यानही पेट्रोल आणि डिझेलचे जैसे थे आहे. आज जाहीर झालेल्या इंधन दरनुसार आज पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणाही बदल झालेला नसून जुन्याच पातळीवर दर कायम आहेत. परंतु दुसरीकडे गेल्या दिवशी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती.
तेलाच्या किमती खाली येऊ शकतात
गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर त्याच ठिकाणी कायम आहेत. यामध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई दिसून येत असल्याने तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता अनेक माध्यमांतून व्यक्त होत आहे.
कच्चे तेल नवीनतम दर
पुन्हा एकदा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली पोहोचली आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 95 पर्यंत घसरली. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड देखील $ 100 प्रति बॅरलच्या खाली $ 99 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी व्हॅटही कमी केला. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर आठ रुपयांनी तर डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी झाले आहेत.
जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल 112.19 रु. प्रति लिटर तर डिझेल 97.34 रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.