---Advertisement---
वाणिज्य

पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं सगळं!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याचे मानले जात आहे. पण पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारने 21 मे रोजी शेवटच्या वेळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.महाराष्ट्रमध्येहीतीन महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता.

petrol diesel jpg webp

पेट्रोल-डिझेल आता स्वस्त होणार का?
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अद्याप कोणताही दिलासा मिळाला नसल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारशी कपात करणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की तेल कंपन्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आणखी वेळ हवा आहे.

---Advertisement---

जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत.

तुमच्या शहरातील आजची किंमत (पेट्रोल-डिझेल ११ सप्टेंबर रोजी)

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---