जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे ऐन सणासुदीत देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. आज बुधवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. त्यानुसार पेट्रोल प्रतिलीटर ३५ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले आहे. यामुळे जळगावात पेट्रोल प्रति लिटर ११५ रुपयांपर्यत पोहोचले आहे. तर डिझल १०४ रुपयापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आधीच देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली गेली असतात त्यात सततच्या इंधन दरवाढीचा बोजा सहन करावा लागत आहे. पेट्रोलिय कंपन्यांनी मागील गेले दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते.देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.
जळगावात गेल्या महिन्याभरात २७ सप्टेंबर ला पेट्रोलचा प्रति लिटरचा दर १०८.५२ पैसे इतका होता. त्यात आतापर्यंत ७ रुपयाची वाढ झाली आहे. तर २७ सप्टेंबर डिझेलचा दर ९६.६३ प्रति लिटर इतका होता. त्यात आतापर्यंत ७ रुपयाची वाढ झालीय. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दररोज ६ वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.