⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

इंधन दरवाढीचा शॉक ! 7 दिवसात 4 रुपयाने महागले पेट्रोल-डिझेल

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । इंधन दरवाढ सुरूच आहे. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं आज पेट्रोलचे दर 30 पैसे तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटर वाढवले आहेत. गेल्या 7 दिवसांबद्दल बोलायचे झाले तर 6 वेळा वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 4.10 पैशांनी वाढल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात काल डिझेल 97.67 तर पेट्रोल 114.91 रुपयांनी विकलं जात होतं. तर आज 30 ते 35 पैशांची वाढ झाल्यानं डिझेल 98.03 रुपये तर पेट्रोल 115.22 रुपयांनी विकलं जातंय. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 116.86 तर डिझेलचा दर 99.41 इतका आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल 114.42 रुपये तर डिझेल 97.34 रुपयांनी विकलं जात आहे. मुंबई मध्ये पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी महागल आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 114.19 रुपये तर डिझेलचा दर 98.50 रुपये इतका आहे.

जनतेच्या खिशावर परिणाम
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या वाढीव वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा धक्का बसला आहे. इंधनाचे दर चार महिन्यांपासून स्थिरावल्यानंतरही असे चक्र सुरू झाले जे थांबण्याचे नाव घेत नाही.