⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

इंधन दर : वाचा आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । एक दिवसाच्या घसरणीनंतर आज बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आज पेट्रोल डिझेल दर जैसे थे आहे. त्यापूर्वी काल मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैशांची कपात केली होती. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.८५ रुपये इतका झाला आहे.

जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १६ रूपयेपर्यंत तर डिझेलचे १४ रूपये प्रति लिटर वाढले आहेत.

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.५२ रुपये तर डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये तर डिझेल ८८.९२ रुपये आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.