जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । आज मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जाहीर केला. तब्बल ११० दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जैसे थे ठेवले आहे. तूर्त कंपन्यांनी आज मंगळवारी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी इंधन दरात कोणताही बदल केला नाही.आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
रशिया आणि युक्रेन संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ज्याचा मोठा फटका कच्च्या तेलाच्या बाजारपेठेला बसेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहे नजीकच्या काळात कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलर पार जाण्याहची शक्यता आहे. तर देशातील राज्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरु असल्याने कंपन्यांनी तूर्त इंधन दरवाढ रोखून धरली असल्याचे बोलले जाते.
देशातील बड्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबईत आज २२ फेब्रुवारी रोजी एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये असून डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.
डिझेल दर
आज एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.
हे देखील वाचा :
- सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?
- सोने 660 रुपयांनी महागले; खरेदीला जाण्यापूर्वी आजचे भाव पहा..
- सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव पुन्हा घसरला..
- रेशनकार्डधारकही सायबर ठगांच्या निशाण्यावर; अशी करताय फसवणूक? अशी काळजी घ्या..
- धारावीचा कायापालट करण्याचा प्रकल्प हाती घेत फडणवीस शिंदे सरकारचा अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस!