जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । मागील दोन महिन्यांमध्ये झालेल्या दरवाढीने पेट्रोलने अनेक शहरांमध्ये शंभरी ओलांडली आहे. पाठोपाठ डिझेलदेखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. इंधन दरवाढ नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्यास कारणीभूत ठरणार आहे. दरम्यान, आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवले.
एक दिवसआड पेट्रोलियम कंपन्या दरवाढीचा शॉक देत आहेत. सततच्या दर वाढीने जळगावमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०४.२७ वर गेले आहे. तर डीझेल ९४.८२ प्रति लिटर वर गेले आहे. गेल्या एका महिन्यात पेट्रोल ५ रुपयाहून अधिक ने वाढले आहे तर डीझेल देखील ५ रुपयाने वाढले आहे. आधीच कोरोना लॉकडाऊनमध्ये महागाईने भडका उडाला असता त्यात सततच्या पेट्रोल दर वाढीने सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे.
देशभरातील मोठ्या शहरातील दर
आज शनिवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.०८ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.९३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.१४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९६.८४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०८.६७ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९६.३५ रुपये आहे. देशात सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. मुंबईत
डिझेलचा आजचा भाव ९५.१४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८७.६९ रुपये आहे. चेन्नईत ९२.३१ रुपये आणि कोलकात्यात ९०.५४ रुपये डिझेलचा भाव आहे.