जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ सतत सुरुच आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल दरात 35 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे जळगावात पेट्रोल च्या एका लिटरसाठी ११२.५८ रुपये मोजावे लागत आहे. तर डिझेलसाठी १०१.६० रुपयांवर गेले आहे.
आधीच महागाईचा भडका उडाला असता त्यात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती सतत वाढत आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. पेट्रोल-डिझेल दरात या महिन्यात जवळपास दररोज वाढ झाली आहे. या महिन्यात केवळ १० दिवसांत पेट्रोल दर जवळपास ३ रुपयाने महागलं आहे, तर डिझेल दरात ३.३० रुपये वाढ झाली आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.