जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । गेल्या काही दिवसापूर्वी रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा भाव १३९ डाॅलरपर्यंत वाढला होता. मात्र आठवडाभरात त्यात मोठी घसरण झाली असून तो १०० डाॅलर खाली घसरला आहे. दरम्यान, आज भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जारी केला आहे. त्यात आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले. आज डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग १३२ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत.
आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात प्रति बॅरल मागे 40 डॉलरची घट झाली आहे. सात मार्चला क्रूड ऑईलचे दर 139 डॉलर प्रति बॅरल होते. तर चालू आठवड्यात ते 99 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत. याचाच अर्थ कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सरासरी चाळीस डॉलरची घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होने ही भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. कारण भारत हा कच्च्या तेलाचा जगातील एक मोठा आयातदार देश आहे.
देशभरातील बड्या शहरातील दर
दरम्यान, आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.
आज एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.५३ रुपये इतका झाला. कोलकात्यात मात्र डिझेलचा भाव ८९.७९ रुपयांवर कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.