⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पेट्रोल-डीझेल पुन्हा महागणार? वाचा आजचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीने आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर 2014 नंतर आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. असे असले तरी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी तीन महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.आज मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जाहीर केला. आज देखील पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

आधीपासूनच महागाईत होरपळत असलेल्या जनतेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेल आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Price Today) असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे.

देशातील इतर मोठ्या देशातील दर
इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, महानगरांमध्ये, पेट्रोल मुंबईमध्ये सर्वात महाग आहे 109.98 रुपये प्रति लिटर आणि दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 95.41 रुपये आहे, तर आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोलची विक्री केली जाते. पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लिटर दर आहे, तर डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर आहे.

आज मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे. त्याचवेळी डिझेलचा दरही 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. तेलावरील व्हॅट आणि मालवाहतुकीच्या दरामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यानुसार बदलतात.

हे देखील वाचा :