जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले. नव्या दरानुसार आज देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. सलग १० व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे तूर्त दरवाढीला ब्रेक लागला. मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी महागले.
इंधनाचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकार एक्साइज ड्यूटी (Excise duty on petrol) कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार एक्साइज ड्यूटी कपातीचा पेट्रोलियम मंत्रालयाचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता एक्साइज ड्यूटीमध्ये कोणतीही कपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १२१.६९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर १०४.३४ रुपये इतका आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल,डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे.
औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.11 रुपये तर डिझेल 102.82 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.30 आणि 104. 30 रुपये लिटर आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आज पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे.