⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर गेल्यानंतरही तेलाच्या किमती स्थिर आहेत. आज, शनिवार, १२ फेब्रुवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे जात आहेत. मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर डिझेल 94.14 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. डिझेलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तो 89.79 रुपये इतका कायम आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात, अशी माहिती आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीनुसार वाढतात किंवा कमी होतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या असल्या तरी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.

हे देखील वाचा :