जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका उडाला असला तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे. गेल्या ४ महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
पाच राज्यांतील निवडणूक प्रक्रियेमुळे कंपन्यांनी तब्बल चार महिने इंधन दरवाढ रोखून ठेवली होती. आज देशातील पाच राज्यांचा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल २५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढल्याने महसूल कमी होत असल्याने सरकारकडे पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले जात आहे.
देशभरातील मोठ्या शहरातील पेट्रोलचे दर
पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १२६ व्या दिवशी प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल दर जैसे थे ठेवले आहेत. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे.
बाजाराच्या मंदी-तेजीच्या प्रवासाचे हे ठरले साक्षीदार, गुरुवारीही या लक्षणीय स्टॉक्सवर नजर हवी
भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.
आज एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.५३ रुपये इतका झाला. कोलकात्यात मात्र डिझेलचा भाव ८९.७९ रुपयांवर कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.