---Advertisement---
वाणिज्य

पेट्रोल-डीझेल दरात पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

petrol diesel
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । मागील काही महिन्यापासून सुरु असलेले इंधन दरवाढीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. सातत्याने होत असलेल्या पेट्रोल डीझेल दरवाढीने सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डीझेल दरात वाढ करण्यात आलीय.

petrol diesel

आज शनिवारी पेट्रोलच्या किंमतीमध्ये साधारण ३० ते ३९ पैसे आणि डिझेलच्या दरात २४ ते ३२ पैशांची वाढ झाली. या दरवाढीनंतर जळगावमध्ये पेट्रोल दर १०८ रुपये प्रति लिटर पर्यंत गेले असून डीझेल ९७ रुपये प्रति लिटर गेले आहे. अशीच दरवाढ होत राहिल्यास पेट्रोलपाठोपाठ लवकर डीझेल शंभरी गाठू शकते.

---Advertisement---

आजचा दर 

जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.०९ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे.

मागील गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डीझेल दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. जुलै महिना उजाडल्यापासून पेट्रोलच्या दरात सहावेळा तर डिझेलच्या दरात चारवेळा दरवाढ झाली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल १६ वेळा दरवाढ झाली होती. मे महिन्यातही इंधनाच्या दरात १६ वेळा उसळी पाहायाला मिळाली होती. 

दरम्यान, जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०८.०९ रुपये पर्यंत आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९७.०८ प्रति लिटर झाले आहे.   

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---