जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने जागतिक कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आज मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी यूपी, बिहारसह अनेक राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price Today) बदल केले आहेत.
परंतु मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांत आजही पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहे. मागील जवळपास चार महिन्यांपासून इंधन दरात बदल झालेला नाही. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर –
– दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
– मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?