जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यात नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत इंधन स्वस्त केले. यामुळे हागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला. पेट्रोलवरील प्रतिलिटर ५, तर डिझेलवरील प्रतिलिटर ३ रुपये व्हॅट कमी करण्यात आला. मात्र इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात पेट्रोल महागच आहे. कारण अहमदाबाद मध्ये ९७.१३ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.८७ रुपये प्रति लिटर मिळत, भोपाळ मध्ये पेट्रोल १०८.३२प्रति लिटर तर डिझेल ९३.६१ रुपये प्रति लिटर मिळत, बंगळुरू मध्ये पेट्रोल १०१.९४ प्रति लिटर तर डिझेल ८७.७९ रुपये प्रति लिटर मिळत, हैदराबाद मध्ये पेट्रोल १०९.६६ प्रति लिटर तर डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर मिळत, दमन मध्ये पेट्रोल ९४.२४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर मिळत, पणजीमध्ये पेट्रोल ९८.०८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.६२ रुपये प्रति लिटर मिळत. मात्र महाराष्ट्र्रात पेट्रोल १०७ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४ रुपये प्रति लिटर मिळत.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र्रात हे नवे दर लागू झाले. इंधनाचे दर कमी होऊनही महाराष्ट्र्रात भाजपशासित गुजरातपेक्षा १० रुपये व कर्नाटकपेक्षा ५ रुपये दर राज्यात अधिक आहेत. यामुळे राज्याच्या महसुलास ६ हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
केंद्र व राज्याचा वाटा
पेट्रोलची मूळ किंमत हि ५६.०३ इतकी आहे. ज्यात केंद्रीय कर २७.९० इतका आहे. डीलर कमिशन हे ०३.६८ इतक आहे. आणि राज्याचा व्हॅट हा ३२.९० आहे. तर दुसरीकडे डिझलची मूळ किंमत ५७.६९ आहे. केंद्रीय कर २१.८० आहे. डीलर कमिशन ०२.५८ इतका आहे. आणि राज्याचा व्हॅट २२.७० आहे.पेट्रोलवर ३२.५५ पैसे प्रतिलिटर व्हॅट होता. ५ रुपयाने कपात केली म्हणजे ही कपात १५ टक्के आहे. डिझेलवर २२.३७ पैसे प्रतिलिटर व्हॅट होता, त्यात ३ रु. कपात केली म्हणजे कपात केवळ १३ % आहे.
महाराष्ट्राची कमाई : वर्ष २०२१-२२ मध्ये महाराष्ट्राला डिझेलवरील व्हॅटमधून १७ हजार ८६० कोटी, तर पेट्रोलवर व्हॅटमधून १३,७५६ कोटी रुपये असा ३१ हजार ६१६ कोटी महसूल प्राप्त झाला होता.
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 106.35 94.28
पुणे 106.75 93.20
नागपूर 108.06 92.60
औरंगाबाद 108.00 89.00
नाशिक 106.78 92.24
जळगाव 107.60 94.03