जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा न्यायाधिशांविरुद्ध खोटी तक्रार तालुक्यातील भोजे येथील एकाला भोवली. त्याला पाचोरा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे खळबळ उडाली.
पाचोरा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. औंधकर यांचे कोर्टात फौजदारी अर्ज क्र. १५७/२०२४ चा न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांच्या विरुद्ध भोजे ता. पाचोरा येथील नीलेश नामदेव उभाळे याने न्यायाधीश (चौकशी) कायदा १९६८ चे कलम ३ नुसार तक्रार दाखल केली. त्यावर दखल घेत पाचोरा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. औंधकर यांनी तक्रादार यास लेखी पुरावे सादर करण्याचा आदेश १८ सप्टेंबर २०२४ रोजी दिला होता.
मात्र निलेश उभाळे कोणतेही पुरावे प्रकरणात दाखल केले नाहीत. त्यावर अभिलेखावरील सर्व कागदपत्रे पुरावा अवलोकन करून दिलेली तक्रार खोटी असल्याचे सिध्द झाले. परिणामी न्यायाधीश जी. बी. औंधकर यांनी तक्रारदार नीलेश उभाळे यांना २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. यामुळे खळबळ उडाली.