⁠ 
सोमवार, मे 27, 2024

शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना शंका! विधानसभेत भाजप मदत करेल का? गुलाबराव पाटीलांकडून संभ्रम दूर, म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ जळगावमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. भाजपला शिवसेना शिंदे गट लोकसभेसाठी मदत करेल. मात्र विधानसभेत भाजप शिवसेना शिंदे गटाला मदत करेल का? अशी शंका काही कार्यकर्त्यांच्या मनात असल्याची चर्चा जळगावात रंगली होती. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी भाजपबाबत कार्यकर्त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
शिंदेंच्या सेनेचे आमदार सांगतात की लोकसभेत भाजपचे काम केले तरी ते विधानसभेत मदत करतील का? मात्र आम्ही एका बापाची औलाद आहोत. हे भाजपा काम करो अथवा ना करो, आम्ही इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत, आगे जो होगा वो हमारा नसीब, आमचं काम हे आग विझविणाऱ्या चिमणीसारखे आहे. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा लहरायचा आहे. असे गुलाबराव पाटील म्हणाले

मंत्री पाटीलांकडून ईडी कारवाईचे समर्थन
यावेळी ईडी कारवाईचे ही गुलाबराव पाटील यांनी आपल्या शेरो शायरी माध्यमातून समर्थन केले आहे. केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो. मोदीजींनी काही कारवाया केल्या तर विरोधक सांगतात की हे ईडीचे सरकार आहे. इमानदारो के लिये लहर है मोदी, बेईमानो के लिये जहर है मोदी, देश के गद्दारो के लिये जहर है मोदी, अशी शेरो शायरी करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना डिवचले आहे.