⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

शेतकऱ्यांना पावला बाप्पा : मिळाला तब्बल ‘इतक्या’ हजारांचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. यावेळी शेतकऱ्यांना बाप्पा पावल बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.

पांढऱ्या सोन्याचे नंदनवन असलेल्या बोदवड तालुक्यात बुधवारी सातगाव डोंगरी १४,७७२ रुपये कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यात खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सोळा हजारांचा भाव देण्यात आल्याने कापसाची यंदाची सुरुवात जोरदार झाली. वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजारांचा भाव मिळाला.

सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथील व्यापारी बालू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला. पहिल्या दिवशी ६७ किलो कापूस खरेदी झाला. धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. मुहूर्ताचा भाव यावेळी ११ हजार १५३ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

असा मिळाला भाव

बोदवड : १६,००० रुपये,
बाळद : ११,५५१ रुपये,
धरणगाव : ११,१५३ रुपये ,
कासोदा : ११,०११ रुपये,
कजगाव : ११,००० रुपये

पहिल्याच दिवशी मुहूर्तावर साधारण एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. धरणगाव तालुक्यातील जिनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात होत असते. यावेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.