जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील हर्षदा रोहित पगारे यांना तसेच मुंबई येथील विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख, भारतातील इतर राज्यातील १३ व एक परदेशी नागरिकांना संशोधन कार्यासाठी जर्मन सरकारने पेटंट दिले आहे. त्यामुळे याबद्दल हर्षदा रोहित पगारे यांचे घाेडगावसह परिसरात काैतुक हाेत आहे.
तालुक्यातील घाेडगाव येथील प्रा. अरुण रजाळे यांची हर्षदा ही कन्या आहे. प्रा. हर्षदा रजाळे यांचा व्हेइकल ॲडाक नेटवर्क, फार दि प्रिव्हेन्शन ऑफ ट्रॅफिक ऑक्सिडेंट अर्थात वाहतूक अपघात रोखण्यासाठी वाहन तदर्थ नेटवर्क या संशोधनाला फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी द्वारे तेथील प्रेसिडेंट ऑफ दी जर्मनी पेटंट आणि ट्रेडमा्र्ककडून पेटंटची मान्यता मिळाली आहे. प्रा. हर्षदा रजाळे-पगारे एम. ई. आहे. मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंग करत असताना त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. त्या मुंबई येथील विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक आहेत. त्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील अरूण व रत्ना पगारे यांच्या स्नुषा तर घोडगाव येथील सूतगिरणीचे संचालक प्रकाश रजाळे, सुदाम रजाळे, युवराज रजाळे यांची पुतणी आहेत.