जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२४ । उत्तर रेल्वे मधील पलवल स्टेशन येथे पलवल ते न्यू प्रिथला यार्ड येथे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य घेण्यात येणार आहे. त्याकरिता भुसावळामार्गे धावणाऱ्या काही प्रवासी गाडी रद्द करण्यात आले आहे तर काही गाड्यांच्या मार्गात परिवर्तन करण्यात येत आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
११०५७ मुंबई -अमृतसर क्र पठाणकोट एक्सप्रेस (३ ते १५ सप्टेंबर), क्र. ११०५८ अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्सप्रेस (६ ते १८), क्र. १२४०५ भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस (८ ते १७ सप्टेंबर) क्र. १२४०६ हजरत निजामुद्दीन भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस (६ ते १५ सप्टेंबर). मार्गात बदल झालेल्या गाड्या क्र. १२१३७ मुंबई-फिरोजपूर एक्सप्रेस आणि क्र. १२१३८ फिरोजपूर-मुंबई एक्सप्रेस (५ ते ९ सप्टेंबर) मथुरा, अलवर, रेवारी, अस्थल, बोहार मार्गे, क्र. १२६१७ एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१५ रोजी) व क्र. १२६१८ हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस (६ ते १७ सप्टेंबर) गाझियाबाद, मितावादी, आग्रा मार्गे वळवली जाईल. क्र. १२७७९ वास्को दि गामा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (४ ते १५ सप्टेंबर) व क्र. १२७८० हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा एक्सप्रेस (६ ते १७ सप्टेंबर) आग्रा, मितावादी, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन मार्गे वळविण्यात आल्या आहेत.