जळगाव शहर

नाथाभाऊंच्या शेतातील खजुरने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला रोजगार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल ? याकरिता संशोधन करण्यासाठी त्यांच्या शेतात पांढरे जांभूळ , पिवळी खजूर, चिकू, मोसंबी आदी फळांची लागवड केलेली होती. सदर प्रयोग यशस्वी झालेला असुन त्यांच्या शेतातील पिवळी खजूर आज जळगावात विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील काही गरजू कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा याहेतूने जळगाव शहरात 10 ठिकाणी खजूर विक्री केली जाणार आहे. या खजुराचे बाजारमूल्य 400 रुपये किलो असले तरी कार्यकर्त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी निम्मे किमतीत म्हणजेच फक्त 200 रुपये किलो प्रमाणे खजूर विक्री करण्यात येणार आहे . आज दुपारी चिमुकले राम मंदिर जवळ खजूर विक्री स्टॉल चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, अमोल कोल्हे, भगवान सोनवणे, रिकू चौधरी, रहीम तडवी, सुशील शिंदे, नईम खाटिक, संजय जाधव, धवल पाटिल, राहुल टोके, हितेश जावळे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button