Jamner : बैलगाडीसह बैल जोडी विहिरीत पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू

जानेवारी 19, 2025 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२५ । जामनेर तालुक्यातील खांडवे येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ज्यात चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याची बैलगाडी व बैल जोडी विहिरीत पडली. यात दोनही बैलांचा मृत्यू झाला असून यामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले

khandve news

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील खांडवे येथील शेतकरी अरुण पर्वते हे चारा आणण्यासाठी बैलगाडीसह शेतात गेले होते. यादरम्यान त्यांनी बैलगाडी शेतात उभी केली. त्याचवेळी नील गाईचा कळप धावत आल्याने त्या भीतीने बैलगाडीला जुंपलेली बैल जोडी पळस सुटल्याने थेट बैलगाडीसह विहिरीत जाऊन पडली.

दरम्यान या घटनेत बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्या असून जेसीबीच्या साह्याने बैलगाडी व बैलांचे मृतदेह हे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेनं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now