---Advertisement---
पाचोरा

ऑक्सीजन, रेमेडीसीवरचा तुटवडा, आ.किशोर पाटलांनी घेतली बैठक !

mla kishor patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  भडगाव तालुक्यासह जिल्हाभरात कोविड रुग्णांना भासणाऱ्या ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा आणि यावर करावयाच्या उपाय योजनांबाबत आ. किशोर पाटील यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख डॉक्टर्स, कोविड केअर सेंटर चालक, व मेडिकल डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली.

mla kishor patil

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे सह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती. बैठकीत ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेशनच्या तुटवड्या बाबत आ. किशोर पाटील यांनी थेट बैठकीतूनच आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मतदार संघासह जिल्ह्याची व्यथा मांडत आम्हाला प्राधान्याने रेमेडिसिव्हर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी विनंती केली यावर दोघे मंत्री महोदयांनी आ. किशोर पाटील यांना सकारात्मक प्रतिसाद देत तुम्हाला कोरोना नियंत्रणासाठी ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर सह इतर देखील वैद्यकीय साधन सामुग्रीची कमतरता भासू न देण्याचे आश्वासन देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. याबाबत आपण आजच पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांची भेट घेणार असून जनतेच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आपण आजच मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया आ. किशोर पाटील यांनी दिली आहे.

---Advertisement---

यांची होती उपस्थिती

आज झालेल्या बैठकीला तहसीलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, भडगावचे नायब तहसीलदार एम. डी. मोतेराव, तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, भडगावचे डॉ. प्रशांत पाटील, डॉ. भूषण मगर, डॉ स्वप्नील पाटील  डॉ. नरेश गवांदे, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. प्रवीण माळी, डॉ. सागर गरूड, डॉ. संकेत विसपुते, डॉ. जीवन पाटील, डॉ. निलेश पाटील, मेडिकल असोसिएशनचे राजेंद्र भोसले, शरद मराठे,भडगावचे सुरेश भंडारी, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती. 

बैठेकीत प्रारंभी आ. पाटील यांनी सर्वप्रथम मतदार संघातील सर्व वैद्यकीय व्यवसायिक चांगले परिश्रम घेऊन दिवसभरातील अठरा अठरा तास काम करून कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आपण पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याने तत्पूर्वी आपल्या देखील अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी डॉ. संकेत विसपुते यांनी ऑक्सिजनच्या पुरेश्या पुरावठ्या बाबत कैफियत मांडली तर डॉ. सागर गरुड यांनी ऑक्सिजनचे वाढलेले दर, रेमेडिसिव्हर इंजेक्शन फक्त कोविड केअर सेंटर चालकांकडेच उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी केली. 

तर डॉ. भूषण मगर, डॉ. जीवन पाटील, राजेंद्र भोसले, शरद मराठे आदींनी सांगोपांग चर्चा केली. सध्या सुमारे पाचोरा भडगाव मध्ये एक हजार इंजेक्शनची दर दिवसाला गरज असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. ग्रामीण भागात  काम करणाऱ्या डॉक्टर्स मंडळींनी देखील पेशंट अत्यवस्थ होण्याच्या आधीच त्यांना आवश्यक उपचार देण्यासाठी पुढे पाठवले पाहिजे तसेच गृह विलगिकरणात असलेले पेशंट अनेकदा बाहेर फिरत असल्याने त्यामुळे देखील प्रादुर्भाव वाढत असल्याचे मत बैठकित व्यक्त करण्यात आले तर प्रांताधिकारी कचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वच मेडिकल मध्ये असलेल्या रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा साठा आम्ही तपासत असून या बाबत तहसीलदार माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले तर आ.पाटील यांनी डॉक्टर बांधवानी देखील केवळ नर्स वा तत्सम कर्मचाऱ्यांवर विसंबून न राहता दिवसातून दोन तीन वेळा पेशंटची स्वतः तपासणी करावी, रक्तांचे नमुने नियमित तपासून इतर काही व्याधी वाढणार नाहीत याची दक्षता घेण्या सोबतच या अडचणीच्या काळात सर्वच घटकांनी माणुसकी दाखवत रुग्णांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचे काम करावे, तसेच विविध चाचण्यांचे जादा दर आकारू नये शासनाने निर्धारित केलेल्या दरातच उपचार करावे. असे आवाहन उपस्थित डॉक्टर्स बाधवांना केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---