
‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ अंतर्गत नागरिकांचा सहभाग; इच्छुक रक्तदात्यांनी केले रक्तदान
जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुंबई यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ अंतर्गत तेरापंथ भवन, भुसावळ येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद, भुसावळ यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला नागरिकांचा तसेच इच्छुक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सामाजिक बांधिलकी जपत अनेक इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले. गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीने शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. सौ. केतकीताई पाटील, भुसावळ नगराध्यक्ष नारखेडे ताई, रजनीताई सावकारे, नर्सिंग सेविका प्राची पाटील, नगरसेवक गिरीष महाजन, किरण कोलते, परीक्षित बर्हाटे, आयोजक नगरसेवक रवींद्र निमानी, भोजराज पाटील, निक्की बत्रा, आनंदा ठाकरे, बंटी निमानी, अभय छाजेड, जय निमानी, जय मातृभूमी मंडळाचे अध्यक्ष वरुण इंगळे, रितेश वारके आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरास श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, भुसावळ तसेच सुपात्र युवामंच, भुसावळ यांचे सहकार्य लाभले.रक्तपेढीतर्फे डॉ. श्रद्धा उभाडे, डॉ. आर्या ठाकुर, रक्तपेढी समन्वयक लक्ष्मण पाटील, संदीप बेंडाळे, राज तवर, दिनेश भोळे, ज्योती खलसे तसेच नर्सिंग कर्मचार्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.आरोग्य तपासणीसोबतच रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकीचे सकारात्मक उदाहरण ठरले.





