संतापजनक : बापानेच केले पोटच्या पोरी सोबत अश्लील चाळे
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांनी त्या नराधम बापाला गजाआड केले आहे.
अधिक माहिती अशी कि, नराधम बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाणा प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढेन, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती.
मात्र मागील काही दिवसांपासून हे प्रकार वाढल्यामुळे त्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने शेवटी आईला सर्व घटना सांगितली. त्यानंतर आईने मुलीच्या मामांनाला म्हणजेच आपल्या भावांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर मंगळवारी रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.