---Advertisement---
जळगाव शहर

जागतिक योग दिनानिमित्त योगयज्ञचे आयोजन, उडाण फाऊंडेशनचा सहभाग

udan faundesion
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे जागतिक योग दिनानिमित्त भव्य योग यज्ञचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी १०० ठिकाणी करण्यात आले. जळगाव शहरातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राने देखील त्यात ऑनलाईन सहभाग नोंदविला.

udan faundesion

महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील २ हजार संस्थांचे संघटन करणारी संस्था आहे. जागतिक योग दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशनच्या १०० सदस्य संस्था राज्यभरात एकाच वेळी योग शिबीरात सहभागी झाल्या. योग शिबिरे श्री श्री रविशंकरजी यांच्या बेंगलोर येथील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

---Advertisement---

पुणे येथील महा एनजीओ फेडरेशनच्या कार्यालयातून ऑनलाइन लिंकद्वारे घेण्यात येणारे हे शिबीर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टरवर दाखवून २५ ते ५० व्यक्तींच्या सहभागाने योगासने, ध्यान, प्राणायाम व देशभक्तीपर गीतांचे श्रवण या उपक्रमांनी साजरे केले गेले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मनसेचे बाळा नांदगावकर यांनी   मनोगत व्यक्त केले. आर्ट ऑफ लिविंगचे अंकित बत्रा यांनी देशभक्तीपर गीत सादर करीत संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले. कार्यक्रमाची सांगता महा एनजीओचे शशांक ओंबासे यांच्या पसायदानाने झाली.

राज्यातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून सर्व नियमांचे पालन करून शिबिर पार पडले. कोरोना हा आजार मनुष्याच्या फुप्फुसांवर आघात करतो. योगा व प्राणायामने फुप्फुसांची कार्यक्षमता तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या शिबिरांचा उपयोग कोरोनापासून बचाव तथा कोरोनामुक्तीसाठी उपाय म्हणून होवू शकतो, शिबिरातील योग आपल्या आयुष्यात नियमितपणे करावे असे आवाहन महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर, उपक्रम प्रमुख गणेश बाकले व मुकुंद शिंदे यांनी केले आहे. 

शिबिरात सहभागी प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपक्रमासाठी जळगावात उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, डॉ.भावना चौधरी, डॉ.विद्या चौधरी, मीना लोखंडे, भावना पाटील, प्रवीण चौधरी, रजत भोळे, हेतल पाटील, चेतन वाणी, धनराज कासट, उत्कर्ष चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/228362412220762/

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---