⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त तालुका स्तरावर दि १८ ते २२ एप्रिल दरम्यान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेळाव्यात हृदयरोग तज्ज्ञ, सर्जन, बालरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, दंतचिकित्सक, भूलतज्ज्ञ तपासणी करणार आहे. शिबिरात सर्व तपासण्या मोफत राहणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.