जिल्ह्यात तीनदिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन २७ ते २९ दरम्यान करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी, एचएससी, पदवीधर, पदविकाधारक, एमई, बीई, कॉम्प्युटर ऑपरेटर, आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण २०५ रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे. अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी दिली आहे.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayanm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व त्यानंतर आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगईन करुन ॲप्लाय करावा.
याबाबत काही अडचण असल्यास ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्याकडे उक्त नमूद कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये, असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.