⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

रक्षा खडसे नाथाभाऊंचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटीलांच्या भेटीला..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । जळगावच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपचे उमेदवार रक्षा खडसे यांनी घरी जावून भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी आपला प्रचार कारावा या हेतून रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेल्या आहेत.

दरम्यान, रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसेंना महायुतीमधील भाजपने उमेदवारी जाहीर केल्यांनतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध करत अनेकवेळा नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडेही बोलून दाखवल्याची माहिती समोर आली होती.

चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करावा यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली होती.नुकतंच शिवसेनेचे मंत्री गुलबाराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता स्वत: रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. रक्षा खडसे या चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. चंद्रकांत पाटील रक्षा खडसे यांच्या विनंतीचा मान ठेवून शहरात प्रचारासाठी सक्रिया होतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.