⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटलांनी घेतली भेट !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटलांनी घेतली भेट !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुरुजन आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात दोघं एकाच व्यासपीठावर !

जळगाव लाईव्ह न्यूज । गुरुपौर्णिमेच्या दिवशी माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. मागील काळापासून जानकीराम पाटील हे पालकमंत्र्यांपासून दूर गेल्याचे चित्र होते. त्यामुळे या दोघं जुन्या मित्रांना एकत्र बघून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जुने सहकारी तथा मित्र माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील हे त्यांच्यापासून अंतर राखून होते. परंतू गुरुपौर्णिमेला माजी जि.प. जानकीराम पाटील यांनी गुलाभाऊंची त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. यानंतर दोघं जण गुलाबराव पाटील फाउंडेशन अर्थात जीपीएस मित्र परिवारातर्फे पाळधी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि गुरुजनांच्या सत्काराच्या कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र दिसले. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात माझे जुने सहकारी आज बऱ्याच दिवसानंतर आपल्यासोबत व्यासपीठावर असल्यामुळे आपल्याला आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. तर हा कार्यक्रम राजकीय नव्हता. गावातील शिक्षकांसोबत आपण कार्यक्रमाला गेलो होतो. पण गुलाबभाऊंची भेट झाल्याचा आपल्यालाही आनंद असल्याची भावना जानकीराम पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दूर गेलेले जानकीराम पाटील पुन्हा एकदा गुलाबभाऊंच्या जवळ येताय का?, अशी कुजबुज देखील कार्यक्रम स्थळी सुरु होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.