जळगाव शहर

शाहू महाराज रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । ‘आरोग्य सुरक्षा सेवा संकल्पाचा’ 2017 मध्ये हे ब्रीद घेऊन आपल्या कार्याच्या विस्तारातून असंख्य जळगावकर व परिसरातील रुग्णांसाठी खूप मोठी दर्जेदार वैद्यकीय उपलब्ध करून देणाऱ्या राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 10 नोहेंबर 2012 रोजी संपन्न होत आहे.

या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दि. 10, 12, 14, 16 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी  10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नाक-कान घसा, दंतरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल तपासणी, नेत्ररोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी इत्यादी संदर्भात तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांवर महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी 0257-2223301 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. हॉस्पिटलमध्ये उच्चशिक्षित तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स व संबंधित स्टाफसह सुसज्ज रुलोरोगविभाग, नाक कान घसा रोग विभाग, नेत्ररोग विभाग, जनरल मेडिसिन, अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधांनी युक्त असा किडनी रुग्णांसाठीचा डायलिसिस विभाग, नवजात शिक्षुविभाग, हृदयरुणांसाठी स्वतंत्र कैथलॅब विभाग व अतिदक्षता विभाग आदी सर्व विभाग प्रभावीपणे कार्यान्वयीत आहेत.

जसे म. जोतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना तसेच इतर इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधादेखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वास्थ्य सुरक्षेचा संकल्प घेऊन हॉस्पिटल 10 नोव्हेंबर 2022 रोजी समर्पित यशस्वी 5 वर्षे पूर्ण करून सेवाव्रत अविरत सुरू आहे. लोकसहभाग व सहकार्याने तसेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलची वाटचाल गतिमान आहे.

येणाऱ्या काळात हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा मानस आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाचा मानस यशस्वी होऊन उत्तरोत्तर असंख्य गोरगरीब –  सर्वसामान्य नागरिकांना अतिशय उच्चतम दर्जाच्या सर्व आरोग्य सेवांचा लाभ होईल.  हॉस्पिटलमधील या सर्व सेवांचा तसेच आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्रकाश चौबे यांनी केले.

यावेळी पत्रकार परिषदेला  संस्थेचे व्हा. चेअरमन भालचंद्र पाटील, विश्वस्थ प्रकाश कोठारी, चंदन अत्तरदे, डॉ. देविदास सरोदे तसेच महाव्यवस्थापक संतोष नवगळे, डॉ. अर्जुन साठे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button