वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मार्च 10, 2022 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्धच्या एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape jpg webp

काय आहे प्रकार?

जळगाव शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी हीची दीपक सोनवणे (पुर्ण नाव गाव माहित नाही) या मुलाशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्या मुलीला काही ना काही कारण सांगून शहरातील फुले मार्केटमध्ये बोलावून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान ही घटना घरी कोणालाही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना मारून टाकेल अशी तरूणाने दिली. तसेच अल्पवयीन मुलीच्या काकाच्या राहत्या घरी देखील तिच्यावर अत्याचार केला आणि “तू जर मला भेटण्यासाठी आले नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या वडिलांना मारून टाकेल” अशी देखील धमकी दिली.

या संदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक सोनवणे (पूर्ण नाव गाव माहीत नाही) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now