⁠ 
सोमवार, मे 6, 2024

यावलला आयटीआयच्या दिशांत समारंभाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यावल येथे आयटीआयच्या दिशांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष ॲड. देवकांत बाजीराव पाटील, अध्यक्ष म्हणून श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य तुषार धांडे व प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती फाऊंडेशनचे संचालक हेमंत दांडेकर हे होते.

भारत सरकार अंतर्गत केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाकडून प्रथमच देशभरात आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा दिशांत समारंभ घेण्यात निर्णय करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने यावल येथील श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्राने यावर्षी प्रथमच छान उपक्रम राबविला. त्यात या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२२ या द्वितीय वर्षातील इलेक्ट्रिशियन ट्रेड प्रथम क्रमांक – गौरव समाधान पाटील. द्वितीय क्रमांक – निलेश दिलीप विचवे व तृतीय क्रमांक – राहुल भोई तसेच फिटर ट्रेड मधूल पहिला क्रमांक – कुणाल पाटील तसेच वर्ष २०२१-२०२२ या प्रथम वर्षात इलेक्ट्रिशियन ट्रेड मधून पहिला क्रमांक – हेमंत गणेश महाजन द्वितीय क्रमांक उज्ज्वल दिलीप निळे तृतीय क्रमांक – तुषार निलेश धांडे (किनगाव) तसेच प्रथम वर्षात फिटर ट्रेड मधून पहिला क्रमांक – निकिता पाटील प्रथम क्रमांक मिळवला सर्व ट्रेड मधून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक यांच्यासह सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे मान्यवर ॲड. देवकांत पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कौतुक करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात आणि गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चे प्राचार्य तुषार धांडे सरांची देखील या सर्व यशाबद्दल कौतुक करत त्यांनी घेतलेले मेहनत परिश्रमाचे फळ याचे ते सर्व श्रेय असल्याचे तुषार धांडे हे महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना मोफत पास देणारे पहिलीच संस्था आहे त्यांच्या या कार्याबद्दल देवकांत पाटील यांनी त्यांचे याच कार्यक्रमात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले व विद्यार्थ्यांनी देखील आपल्या कार्यातून ठसा उमटवावा व श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे नाव यावल तालुका जळगाव जिल्हा व महाराष्ट्रात कसे नाव लौकिक होईल यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशस्वी कामगिरीतून आपली चमक दाखवून खऱ्या अर्थाने श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य व शिक्षकांना गुरुदक्षिणा द्यावी असे सांगितले.

या कार्यक्रमात प्राचार्य तुषार धांडे यांनी विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करता यावी यासाठी आपले प्रशिक्षण केंद्र नेहमी विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे व या पुढेही देत राहील अशी ग्वाही दिली श्री गणेश आय टी आय च्या विद्यार्थ्यांना फी प्रतिपूर्ती चां लाभ बऱ्याच विद्यार्थ्यांना झाला तरी संस्थेचे अध्यक्ष यांचे फी प्रतिपूर्ती मिळाली म्हणून पालकांनी संस्थेचे अध्यक्ष तुषार धांडे यांचे आभार मानले.. तसेच त्यांनी सांगितले की या पुढेही विद्यार्थ्यांना फी प्रतिपूर्ती बाबत पालकांनी विद्यार्थ्यांना अवगत करावे असे त्यांनी सांगितले दिशांत समारंभास उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयटीआय तील सर्व शिक्षक वसीम तडवी , धीरज साळुंके ,योगेश ठाकूर राकेश पाटील देवेश धांडे , जीवन भारुडे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.