⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

कृषि दिनानिमित्त १ जुलैला जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । कृषि विभाग, आत्मा व कृषि विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने हरीत क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त उद्या म्हणजेच १ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पुज्य साने गुरुजी सभागृह, जिल्हा परिषद, जळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असे सुरज जगताप, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून ना. गुलाबराव पाटील, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री, जळगाव जिल्हा हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल हे आहेत. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तर कापुस पैदासकार, कापुस संशोधन केंद्र, जळगाव डॉ. गिरीष चौधरी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, किरण जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. हेमंत बाहेती हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास शेतकरी बांधव तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.