जळगाव जिल्हा

हतनुर धरणाचे 23 दरवाजे उघडे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । संपूर्ण जळगाव जिल्ह्याची तहान भागविणारा संत मुक्ताई सागर (हतनुर) धरण दरवर्षी पहील्या पावसात भरत असते. यामुळे जून मध्ये पहीला पाऊस पडल्यावर ते ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत या धरणाचे काही दरवाजे उघडे असतात. सद्य:स्थितीत दमदार पाऊस सुरू असल्याने काही दिवसांपूर्वी या धरणाचे संपूर्ण म्हणजे ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने आता या धरणाचे २३ दरवाजे काल शनिवारी उघडे होते. मात्र, नेहमी येथे येणाऱ्या हौशी पर्यटकांची गर्दी. मात्र, जिल्हाधिकारी यांचे सुरक्षा कारणाने धरण क्षेत्रात मनाई हुकूम असल्याने दिसून आली नाही.

शनिवार व रविवार सुट्टी चे कारण देत पूर परिस्थिती असतांनाही कोणी मोठा अधिकारी येथे हजर नाही. कर्मचारी यांचे भरवसे येथे पूरपरिस्थितीत वर लक्ष ठेवले जात होते. वास्तवीक नेमणूक ठिकाणीच अधिकार व कर्मचारी यांचे निवास असणे बंधनकारक असतांना येथील अधिकारी सर्रास जळगाव, भुसावळ, अश्या शहराचे ठिकाणी राहून तेथून ये-जा करीत असता. यामुळे ऐन महत्वाचे वेळेस येथे संबंधित अधिकारी अनेक वेळा उपस्थित नसतात व आपल्या खालील कर्मचारी यांचे भरोसे येथील कामकाज चालत असते. तर अनेक वेळा हैशी पर्यटक, अधिकारी यांचे जवळील लोक, राजकारणी यांना थेट धरणाचे वरील बाजूस प्रवेश दिला जातो पत्रकारांना मात्र सुरक्षेचे कारण देत फोटो काढण्यास देखील मनाई केली जाते याबाबतीत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात, तर धरणावरील सुरक्षा कर्मचारी देखील उर्मट वागणूक देत असतात.

दरम्यान या हतनुर धरणास संत मुक्ताई सागर धरण असे नाव दिले गेले असतांना तेथील लिहीलेले नाव आता मात्र अदृश्य झाले आहे. कागदोपत्री देखील अनेक ठिकाणी सर्रास हतनुर धरण असेच नाव वापरले जात असल्याने याबाबतीत देखीक संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालणे आवश्यक असून जे नाव या धरणास दिले आहे तेच वापरात यावे अशी अपेक्षा देखील व्यक्त होत असतांना सोबत येथे सुरक्षीत अंतरावर पर्यटका साठी एखादा पिकनिक स्पॉट उघडल्यास येथील पर्यटनास चालना मिळून स्थानिक लोकांना यातून चांगला रोजगार मिळू शकतो यामुळे याकडे देखील लक्ष पुरवावे ही देखील अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button