बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

जळगाव जिल्ह्यात तृणधान्य मिनीकिटचे होणार वितरण !

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । जगात पौष्टीक तृणधान्यांचे महत्व अबाधित ठेवून उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टोक तृणधान्य मोहिमेंतर्गत पौष्टीक तृणधान्य पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढीच्या अनुषंगाने तृणधान्य पिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

यामध्ये शेत तेथे तृणधान्य व मिलेट क्रॉप कॅफेटेरिया या दोन संकल्पनावर मिनीकिट वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये शेत तेथे तृणधान्य अंतर्गत ज्वारी पिकाचे २८ हजार ७६१ मिनीकिट, बाजरी पिकाचे २२ हजार ८४६ मिनीकिट, राजगिरा पिकाचे ८ हजार ५१२ मिनीकिट, राळा पीकाचे २१ हजार २७० मिनीकिट, कोदो पिकाचे १० हजार ६४० मिनीकिट तर मिलेट क्रॉप कॅफेटेरिया या संकल्पनेत प्रत्येक गावामध्ये २ पौष्टीक तृणधान्य आधारित ५ आर क्षेत्रावर शेतक-यांसाठी तंत्रज्ञान प्रसार करण्याच्या अनुषंगाने क्रॉप कॅफेटेरियाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मिलेट क्रॉप कॅफेटेरिया अंतर्गत ३ हजार ६६६ मिनीकिट निहाय ज्वारी पिकासाठी 1 आर क्षेत्राकरीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट १०० ग्रॅम,

बाजरी पिकासाठी १आर क्षेत्राकरीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट ५० ग्रॅम, नाचणीसाठी १/२ आर क्षेत्राकरीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट ५० ग्रॅम, वरई १/२ आर करीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट ५० ग्रॅम, राळा १/२ आर करीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट ५० ग्रॅम, कोदो १/२ आर करीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट ५० ग्रॅम, कुटकी/सावा करीता १/२ आर करीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट ५० ग्रॅम, राजगिरा/बार्टी १/२ आर करीता बियाणे मात्रा प्रती मिनीकिट २५ ग्रॅम, एकूण ५ आर करीता एकत्रित ४०० ग्रॅम वापरावे.

सर्व मिनीकिट राष्ट्रीय बीज निगम व महाबीज या शासकीय संस्थेकडुन तालुका स्तरावर वितरीत करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.