जळगाव जिल्हाजळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात झाल्या फक्त ३० टक्के पेरण्या !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । जून महिना उलटूनही सध्या पाऊस तसा कमी झाला आहे. अशावेळी याचा परिणाम खरीप हंगामावर झाला आहे. यामुळेच जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यामध्ये केवळ 30 टक्केच पेरणी झाली आहे.

राज्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.मात्र चाळीसगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाच्या विलंबामुळे खरीपच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी विकत घेतलेले बियाणे घरीच आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील ८६ हजार २०३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होत असते.

परंतु दमदार पाऊस होत नसल्याने अजूनही ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. २८ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार ८६ हजार २०३ हेक्टरपैकी फक्त १९ हजार ४६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत साठे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button