जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । शहरातील दोन जणांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकणी सायबर पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६२, रा.गजानन कॉलनी ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना दि. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी मो.क्र.९५०५००५६९१५१ धारक याने धारक याने टेक्स्ट मेसेज करुन QUICK SUPPORT APP डाउनलोड करुन त्याद्वारे अमरेलीवाला यांच्या ईनडसईन या बँकेतील एकुण २० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.
अश्विनी जयेश सावकारे (वय ३५, रा. वाघ, जळगाव ) यांना १५ नोव्हेंबर रोजी कोणीतरी अज्ञात महीलेने ८४४८४६९४१४ यावरुन फोन करत तुमच्या एक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यनंतर विश्वास संपादन करून क्रेडीट कार्डचा ओटीपी प्राप्त करुन घेतला. यानंतर सावकारे यांना त्यांच्या खात्यातून ५० हजार ७७४ रुपये ऑनलाईन परस्पर वळवल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच जळगाव सायबर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.