नागरिकांनो सावधान! पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ऑनलाईन ठगांनी ‘असा’ लावला लाखो रुपयांचा चुना..
जळगाव लाईव्ह न्यूज । 11 फेब्रुवारी 2024 । फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. नागरिकांना विविध प्रकारचे आमिष देऊन गंडविले जात आहे. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ठगांनी तब्बल साडे नऊ लाखाचा चुना लावला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
राजेश प्रदीपकुमार संचेती (39, रा.पाचोरा) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते विमा प्रतिनिधी म्हणून काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. 14 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2023 दरम्यान त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यावेळी त्यांनी ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष दाखविले
त्यानुसार राजेश संचेती यांनी वेळीवेळी त्यांच्या बँक खात्यातून एकूण नऊ लाख 54 हजार 600 ऑनलाईन पध्दतीने पाठविले. दरम्यान त्यांनी भरलेल्या पैशांचा मोबदला किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.