औषध निर्माण अधिकारी महिलेची ऑनलाइन फसवणूक; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत औषध निर्माण अधिकारी महिलेची फोन पे ला रिवार्ड स्टेटमेंट आल्याने सांगून पाठवलेल्या लिंकद्वारे ५४ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक झाली. याप्रकरणी इंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मोबाईलधारकाविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, जिल्हा रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी स्वाती अनिल इंगळे यांच्या मोबाइलवर १२ जानेवारी रोजी एका मोबाइल क्रमांकावरुन संपर्क साधण्यात आला होता. त्याने फोन पे ला रिवार्ड स्टेटमेंट आलेले असून पुढील प्रक्रिया फॉलो करा असे सांगितले. इंगळे यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला सांगितले. त्या लिंकवर क्लिक करतानाच त्यांच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये ऑनलाईन काढून घेण्यात आले आहे.
या प्रकरणी इंगळे यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मोबाईलधारकाविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.