तरसोद गणपतीचे घरबसल्या घेता येणार दर्शन!
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । जगभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणपती मंदिर संस्थान, तरसोदतर्फे जळगाव मोबाईल अँपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.
कोविड काळात धार्मिक स्थळे बंद असल्या कारणाने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोईसाठी श्री गणपती मंदिर संस्थानतर्फे हि विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या अँप च्या माध्यमातून भाविकांना घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण, कार्यक्रम यांची अद्यावत माहितीही उपलब्ध होणार आहे.
नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते अँपचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री गणपती मंदिर संस्थान तरसोदचे अध्यक्ष चंदन अत्तरदे, संचालक अशोक राजपूत, मिलन मेहता, रुपेश चिरमाडे आणि वेबसाईट तथा मोबाईल अँप तयार करणारे किशोर खडसे उपस्थित होते.
असे घेता येईल दर्शन
प्रथम गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून त्यामध्ये https://tarsodganpati.in टाईप करावे. त्यानंतर साईट ओपन होईल, त्यानंतर होम पेजला स्क्रोल डाऊन करून शेवटी एक ADD/Add to home Screen हा मेसेज / Popup / Notification येईल त्यावर प्रेस करून App इंस्टाल करता येईल.
[जर Notification / Popup येत नसेल तर Google Chrome-Setting-Privacy-Clear BrowsingData मध्ये जाऊन Cookies आणि Cached Clear करून घ्यावे ] त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये TarsodGanpati चा आयकॉन दिसेल, त्यावर प्रेस करून श्री तरसोद गणपतीचे दर्शन घेता येईल.
देणगीही देता येईल ऑनलाईन
भाविकांना भीम युपीआय पेटीयम, गुगल पे, फोने पे तसेच डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बैंकिंग याद्वारे देणगी सुद्धा देता येईल असे किशोर खडसे यांनी सांगितले.